फडणवीस यांच्या आदेशानुसार तपास यंत्रणांचं काम : नवाब मलिक
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी महाराष्ट्रात होणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या मुद्यावरुन भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून तपास यंत्रणा काम करत आहेत.ईडीचे लोक कसे भेटतात, कसे कशी कारवाई करतात हे सगळे आम्हाला माहिती आहे. वेळ आल्यावर तिथे आम्ही माहिती बाहेर काढू, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे. याशिवाय हिजाब आणि गोवा निवडणुकीसंदर्भात देखील नवाब मलिक यांनी भाष्य केलं. तर, नवाब मलिक यांच्या आरोपांना भाजप काय उत्तर देणार हे पाहावं लागणार आहे. नवाब मलिक यांनी काल देखील ईडी कारवायांवरुन देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर हल्लाबोल केला होता.
फडणवीस यांच्या सांगण्यावरून राष्ट्रीय तपास यंत्रणा काम करत आहेत. ईडीचे लोक कसे भेटतात, कसे कशी कारवाई करतात, हे सगळे आम्हाला माहिती आहे. वेळ आल्यावर आम्ही माहिती ती बाहेर काढून, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.
कुठला धर्म स्वीकारायचा किंवा कुठला धर्म पाळायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे हिजाब वरती राजकारण करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असं नवाब मलिक म्हणाले.
गोव्यामध्ये ज्या लोकांना क्रिमिनल सांगितलं जात होतं त्या लोकांना तिकीट भाजपने दिली. आता ती लोक पवित्र झाली का? असा सवाल नवाब मलिक यांनी केला. गोव्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत. निकालानंतर येथे त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल आणि त्यानंतर काँग्रेसबरोबर जायचं की नाही त्या संदर्भातला निर्णय होऊ शकेल, असं मलिक म्हणाले.