रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 फेब्रुवारी 2022 (20:53 IST)

उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये भीषण अपघात, भरधाव वेगात असलेल्या कारची ट्रकला धडक, 5 जण ठार

उत्तर प्रदेशातील रामपूर येथे शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण रस्ता अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, येथे एका अनियंत्रित कारने ट्रकला धडक दिली. या अपघातात कारमध्ये चालकासह ६ जण होते, त्यापैकी ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
 
रामपूर जिल्ह्यातील तांडा पोलीस स्टेशन परिसरात हा अपघात झाला. कारमधील सर्व 6 जण यूपी-उत्तराखंड सीमेवर असलेल्या स्वार शहरात लग्न समारंभात सहभागी होऊन  मुरादाबाद येथील आपल्या घरी परतत होते. यादरम्यान कारचे नियंत्रण सुटले आणि समोरून जाणाऱ्या ट्रकवर धडकली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्याचबरोबर जखमी चालकाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  
 
टांडाचे एसडीएम राजेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, टांडाच्या शिकमपूर भागात हा अपघात झाला. घटनास्थळाजवळ क्रॉसरोड आहे.  येथील स्पीड ब्रेकरवरून पुढे गेल्याने कारचे नियंत्रण सुटले असल्याची भीती व्यक्त होत आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले लोक मुरादाबादमधील जयंतीपूरचे रहिवासी आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्वजण इको वाहनात होते. ही अनियंत्रित कार कोणत्या ट्रकला धडकली याचाही शोध घेतला जात आहे.