मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Modified: बुधवार, 9 फेब्रुवारी 2022 (22:37 IST)

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 :प्रियंका गांधी थोडक्यात बचावल्या, मोठा अनर्थ टळला

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 साठी मथुरा येथे आलेल्या काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या रोड शो दरम्यान सुरक्षेमध्ये मोठी त्रुटी झाली. प्रियंका गांधी यांचा ताफा छत्ता बाजारातून जात असताना येथील विजेचा तार  प्रियंका गांधींच्या चेहऱ्यावर आदळणे थोडक्यात टळले. सुदैवाने सुरक्षा कर्मचार्‍यांनी वेळीच विजेची तार पकडून ती बाजूला करण्यात आली.
 
निवडणूक प्रचारासाठी प्रियंका गांधी मंगळवारी मथुरा येथे पोहोचल्या होत्या . येथे त्यांनी प्रथम यमुनेची पूजा केली आणि त्यानंतर कारमध्ये बसून रोड शो करत शहराच्या मध्यभागी असलेल्या बाजारपेठेतून बाहेर पडली. प्रियंका गांधींना पाहण्यासाठी मथुरेच्या छत्ता बाजारात  हजारो लोकांची गर्दी झाली होती. दोन्ही बाजूंच्या छतावर उभे असलेले सर्व लोक त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करताना दिसत होते.

यावेळी प्रियंकाच्या सुरक्षेसाठी कमांडो पथकासह तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, मात्र प्रियांका गांधींचा ताफा होळी गल्लीजवळ पोहोचल्यावर सर्वात मोठा निष्काळजीपणा समोर आला. तेव्हा मधल्या रस्त्याच्या अगदी खाली  एक इलेक्ट्रिक केबल लटकत होती. पोलिसांच्या ताफ्यासह सर्व वाहने बाहेर पडत राहिली, पण कोणीही ती हटवली नाही आणि प्रियंका गांधींची गाडी त्या ठिकाणी पोहोचताच हवेत लोम्बकळत असलेली इलेक्ट्रिक केबल प्रियंका गांधींच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ आली. मात्र, सुदैवाने तिथे उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांना ती वायर दिसली आणि त्याचवेळी  एका काँग्रेस नेत्याने ती वायर उघड्या हातांनी धरून बाजूला करून प्रियंका गांधींना वाचवले.