शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 जून 2019 (09:53 IST)

हे आहेत नवीन मंत्री तर यांच्या खात्यात झाले बदल

राज्याच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. या मंत्रिमंडळात १३ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. आज झालेल्या मंत्रिमडळाच्या विस्तारामध्ये ८ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्री असून त्यांना राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मंत्र्यांच्या शपथविधी नंतर सायंकाळी खाते वाटप करण्यात आले. काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेले राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण हे खाते देण्यात आले आहे.  राज्यपाल विद्यासागर राव यांनी नव्या मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. उद्यापासून (सोमवार) राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत असून त्याआधी हा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार उरकण्यात आला. चार महिन्यांवर विधानसभा निवडणुका आल्या असून त्याआधीचा हा अखेरचा मंत्रिमंडळ विस्तार आहे. काँग्रेसमधून बंड करणारे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा आज थेट मंत्रिपदाच्या 'गिफ्ट'सह भाजपात प्रवेश झाला आहे. मुंबईत भाजपची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे अॅड. आशिष शेलार यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. 
कॅबिनेट मंत्री – कुणाला कोणतं खातं?
 
1. राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) – गृहनिर्माण
 
2. जयदत्त क्षीरसागर (शिवसेना) – रोजगार हमी आणि फलोत्पादन
 
3. आशिष शेलार (भाजप) – शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
 
4. संजय कुटे (भाजप) – कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास वर्ग कल्याण
 
5. सुरेश खाडे (भाजप) – सामजिक न्याय
 
6. अनिल बोंडे (भाजप) – कृषी
 
7. तानाजी सावंत (शिवसेना) – जलसंधारण
 
8. अशोक उईके (भाजप) – आदिवासी विकास
 
राज्यमंत्री – कुणाला कोणतं खातं?
 
1. योगेश सागर – नगरविकास
 
2. अविनाश महातेकर – सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य
 
3. संजय (बाळा) भेगडे – कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन
 
4. डॉ. परिणय फुके – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), वने, आदिवासी विकास
 
5. अतुल सावे – उद्योग आणि खाणकाम, अल्पसंख्याक विकास व वक्फ