रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 एप्रिल 2023 (07:24 IST)

तमाशा चवीने बघणारे लोकं आहेत तोपर्यंत या गोष्टी बंद होणार नाहीत--प्रिया बेर्डें

priya berde
लोककलेची गौतमी पाटील करू नका असं त्यांनी म्हटलं आहे. त्यापाठोपाठ आता गौतमी पाटीलच्या नाचाविषयी अभिनेत्री प्रिया बेर्डेंनी भाष्य केलं आहे.
 
काय म्हटलं आहे प्रिया बेर्डे?
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाबाबत प्रिया बेर्डे म्हणाल्या, “या सगळ्या गोष्टींना बघणारे जबाबदार आहेत. अशा प्रकारची गाणी, तमाशा चवीने बघणारे लोकं आहेत तोपर्यंत या गोष्टी बंद होणार नाहीत. आम्ही कलाकारांनी किंवा राज्यकर्त्यांनी ओरडून कितीही निषेध केला तरी काही उपयोग होणार नाही. आम्ही काही बोललो की आम्हाला ट्रोल केलं जातं. पण म्हणून आम्ही बोलणं थांबवणार नाही. लोकं जोपर्यंत असे कार्यक्रम पाहणं बंद करत नाहीत तोपर्यंत हे सुरुच राहणार” अशी भूमिका प्रिया बेर्डे यांनी मांडली आहे. सांगली या ठिकाणी प्रिया बेर्डे यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांना गौतमी पाटील यांच्या विषयी विचारलं असता त्यांनी हे मत मांडलं आहे.
 
Edited by : Ratnadeep Ranshoor