शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 24 ऑक्टोबर 2021 (15:34 IST)

भाजप नगरसेवकाच्या घरातून चोरटयांनी 50 तोळे सोने, किमती घड्यायासह तिजोरी उचलून नेली

नागपुरातील भाजप नगरसेवक संदीप गवई यांच्या घरातून चोरटयांनी तिजोरीच उचलून नेली. या तिजोरीत 50 तोळे सोने, किमती घडाळ्यासह अनेक मौल्यवान वस्तू असल्याचे समजले आहे. रविवारी सकाळी चोरी झाल्याचे उघड झाले भाजप नगर सेवक संदीप गवई  रमा नगर, शताब्दी चौक परिसराचे नगरसेवक आहे . गवई गिट्टीखदान पोलीस ठाणा क्षेत्र हजारीपहाड येथील रहिवाशी आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते कामानिमित्त 17 ऑक्टोबर रोजी बाहेर गेले होते. त्यांचे काही नातेवाईक घरातच होते. ते 22 ऑक्टोबर रोजी परत आले आणि त्यांनी घरात चोरी झाल्याची माहिती पोलीस ठाण्यात आज रविवारी दिली . पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून घटनास्थळी भेट घेतली. गवई यांनी  दिलेल्या माहितीनुसार, गवई यांच्या शयन कक्षाच्या बाजूस ठेवलेली तिजोरीच उचलून नेली. या मध्ये 50 तोळे सोने, गोल्ड प्लेटेड घड्याळ, इतर मौल्यवान वस्तूंसह 40 ते 50 लाखाचा ऐवज असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत श्वान आणि ठसे तज्ज्ञाचे पथक दाखल झाले . पोलीस घरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन चोरट्यांचा शोध लावत आहे. विशेष म्हणजे की चोरटयांनी तिजोरी शिवाय कोणत्याही वस्तुंना हात लावलेला नाही. या चोरीत कोणी ओळखीचा असावा . अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.