गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 26 नोव्हेंबर 2022 (21:09 IST)

हे तर योग परंपरेला लांच्छन आणणारे : नीलम गोऱ्हे

nilam gorhe
रामदेव बाबांचे ते वक्तव्य योग परंपरेला लांच्छन आणणारे होते, अशा शब्दात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी निषेध केला. रामदेव बाबा यांनी महिलांविषयी केलेल्या विकृत मानसिकता दाखवणाऱ्या विधानाचा मी निषेध करते. त्यांनी योगासारख्या माध्यमातून संयम, स्वाथ्य, अशा गोष्टी समाजाला सांगितल्या असताना स्वतः मात्र महिलांबाबत असा दूषित दृष्टिकोन ठेवणे अत्यंत चुकीचे आहे. प्रत्येकच पुरुष अशा प्रकारे महिलांकडे पाहत नसतात. आपल्या घरात असलेले पुरुष, भाऊ, मित्र, सहकारी अशा अनेक पुरुषांबरोबर स्त्रीचा दैनंदिन जीवनात संपर्क येत असतो, असे गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
 
आपल्या देशात स्वतःला गुरू म्हणवणाऱ्या अशा अनेक पुरुषांची जीभ घसरणे लाजिरवाणे आहे. यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि इतर स्त्रिया तिथे उपस्थित होत्या. पण याबाबत त्यांनीही यावर निषेध म्हणून बोलायला हवे होते. असे डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
Edited by : Ratnadeep Ranshoor