1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 27 जानेवारी 2022 (15:16 IST)

हे फक्त सोयीचे राजकारण, खोटी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रकार : नवाब मलिक

टिपू सुलतानच्या नावाने भाजप राजकारण करत आहेत. भाजपची ही दुहेरी भूमिका या मुद्द्यावर दिसून आली आहे. कर्नाटकात येडुरीयप्प्पा टिपू सुलतान यांची जयंती साजरी करत राहिले. पण मुख्यमंत्री झाल्यानंतर मात्र त्यांनी हा निर्णय बदलला. राष्ट्रपतींनीही आपल्या भाषणात टिपू सुलतानचा उल्लेख करताना शहीद दर्जा देणारा उल्लेख आहे. हे फक्त सोयीचे राजकारण केले जात असून खोटी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रकार असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
 
टिपू सुलतान यांनी इंग्रजांसमोर कधीही आत्मसमर्पण स्विकारले नाही. इंग्रजांशी लढाई करतानाच ते शहीद झाले होते, ही वास्तविकता आहे. पण आता भाजपकडून खोटी प्रतिमा निर्माण करण्याचा हा प्रकार असल्याचे ते म्हणाले. सध्या जो वाद केला जातो आहे, ते राजकारण आहे, असाही आरोप त्यांनी केला.
 
मी काही चुकीचे बोललो असेन, तर भापजपने राष्ट्रपती भवनासमोर ठिय्या आंदोलन करावे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली. जाणीवपूर्वक विवाद निर्माण करून अपमान केला जात आहे, असेही ते म्हणाले.