मंगळवार, 30 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 26 मार्च 2022 (15:04 IST)

नाशिकमधील हेल्मेट सक्तीच्या प्रश्नावर गृह राज्यमंत्र्यांनी दिले हे उत्तर

नाशिक परिक्षेत्रात वाहतूक पोलीसांकडून हेल्मेट सक्ती ही नियमानुसार करण्यात आली असल्याची माहिती, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली. नाशिक परिक्षेत्रात वाहतूक पोलीसांकडून हेल्मेट सक्तीच्या नावाखाली दंड आकारणी होत असल्याबाबत विधानसभा सदस्य शांताराम मोरे व प्रकाश आबीटकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.याला उत्तर देताना गृह राज्यमंत्री श्री. देसाई म्हणाले, व्दारका चौकात अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलीसांनी अवैध प्रवासी वाहतूकदारांकडून ६३ हजार ४०० रूपये दंड वसूल केला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हेल्मेट सक्ती करण्याचे आदेश सर्वच राज्यांना दिलेले होते.

त्यानुसार वाहतूक पोलीसांनी नियमानुसारच कारवाई केली तसेच नाशिक मध्ये १८ जानेवारी ते ११ मार्च दरम्यान विनाहेल्मेट प्रवास करणा-या ८,४७२ लोकांकडून ४२ लाख ३६ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे हा दंड नियमानुसारच केला आहे. अशी माहिती माहिती राज्यमंत्री श्री. देसाई यांनी विधानसभेत दिली.यावेळी तालिका अध्यक्ष संजय शिरसाठ यांनीही हेल्मेटसक्ती आणि नियमबाह्य दंडआकारणी याबद्दल गृह विभागाने आलेल्या तक्रारींदेखील तपासून पहाव्या अशा सूचना केल्या.
 
 जळगांव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मौजे मांडवे खुर्द येथील ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा योजना सुरळीत सुरू आहे, अशी माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य संजय सावकारे यांनी जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मौजे मांडवे खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सार्वजनिक पाणीपुरवठा अंतर्गत उद्भव विहीर व पाईप लाईन कामाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री. पाटील म्हणाले, जळगांव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मौजे मांडवे खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेसाठी १४ लाख ६७ हजार ७६० या कामाकरिता मंजूर करण्यात आले होते. या विहिरीचे काम पूर्ण झाले आहे.

या कामामध्ये समावेश असलेला उद्भव विहीर व पाईप लाईनमध्ये बदल केला असला तरी त्याला शासनाची मान्यता घेण्यात आली आहे. या गावात नियमित पाणीपुरवठा सुरू आहे. तरीही या कामाबाबत काही तक्रारी असल्यास त्याची चौकशी करू अशी माहिती मंत्री श्री. पाटील यांनी विधानसभेत दिली.