शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 सप्टेंबर 2023 (12:40 IST)

विसर्जन करताना तिघांचा बुडून मृत्यू

Palghar News गणपती विसर्जन करताना तिघांचा मृत्यू झाल्याची घटना पालघर जिल्ह्यातील वाडा येथील घडली आहे. जगत नारायण मौर्य (38), सुरज नंदलाल प्रजापती (25) यांचा कोनसई येथील नाल्यात बुडून मृत्यू झाला तर प्रकाश नारायण ठाकरे (35) हे गोऱ्हे येथील तलावात बुडून मृत्यूमुखी पडले आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यासाठी हे लोक गेले होते. तेव्हा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने कोनसई येथील नाल्यात दोघांचा तर गोऱ्हे येथील तलावात बुडून एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.