शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 29 जुलै 2019 (16:02 IST)

संघाला, भाजपला शिव्या देणारे आज त्याच पक्षात प्रवेश करत आहेत

एके काळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाला शिव्या घालणाऱ्यांचे, टीका करणारे सध्या भाजपात पक्षप्रवेश होत आहेत, या शब्दांमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधत टीका केली आहे. उगवत्या सूर्याला सध्या नमस्कार करण्याचे दिवस आले असून, इतरांकडे निष्ठा राहिलेली नाही, मात्र शिवसेनेकडे अद्यापही निष्ठा असून, असं म्हणत राऊत यांनी शिवसेनेतील होणाऱ्या नेत्यांचे प्रवेशाचे समर्थन केले आहे. 
 
काँग्रेस, राष्ट्रवादीतील अनेक भाजपामध्ये प्रवेश करत असून, त्यावर भाष्य करताना राऊत यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा संदर्भ दिला आहे,  भाजपामध्ये होणारे प्रवेश केवळ स्वार्थापोटी होत आहेत असे पाटील म्हणतात. कोणी कुठे गेल्यावर शुद्ध होतो, यावर माझा अजिबात विश्वास नाही. गरजेतून राजकारणात तडजोडी होतात, अशा शब्दांमध्ये त्यांनी भाजपामधील प्रवेशावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.
 
शिवसेना याला अपवाद असून, सचिन अहिर राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले. त्यांना आम्ही कोणतंही वचन दिलेलं नाही. कोणत्याही कमिटमेंटशिवाय ते शिवसेनेत आले आहेत,' असं राऊत यांनी म्हटले आहे. येत्या ३० जुलै रोजी शिवसेना आणि भाजपमध्ये अनेक नेते प्रवेश करणार आहेत. त्यामुळे राज्याचे राजकीय तापमान चांगलेच तापले आहे.