रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 1 ऑगस्ट 2024 (17:28 IST)

टोयोटा 20 हजार कोटींची गुंतवणूक करून महाराष्ट्रात नवीन प्लांट उभारणार

वाहन उत्पादक टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM) कंपनी 20 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह महाराष्ट्रात नवीन उत्पादन प्रकल्प सुरु करणार असे कंपनीकडून समजले आहे. नवीन प्लांट सुरु झाल्यावर कंपनीच्या वाहनांची प्रतीक्षा वेळ कमी होऊ शकते. टीकेएमने एका निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर येथे नवीन उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.
 
टोयोटाने आपल्या समूह कंपन्यांसह कर्नाटकमध्ये 16,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे आणि सुमारे 86,000 नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टमध्ये प्लांटसाठी 20,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची माहिती दिली. 
 
 कंपनी छत्रपती संभाजी नगर येथे ग्रीनफिल्ड उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. येथे इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार तयार करणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की टोयोटा किर्लोस्करचा छत्रपती संभाजीगर येथील प्रकल्प केवळ मठवाड्यासाठी  फायदेशीर नसून राज्यातील संपूर्ण भारतातील ऑटोमोटिव्ह उत्पादन उद्योगात क्रांती घडवणार. 
 
टोयोटा किर्लोस्कर मोटारीचे मुख्यालय कर्नाटक मध्ये असून कंपनीचे आधीच बेंगळुरू जवळ बिदाडी येथे दोन प्लांट आहे. या प्लांट्स मध्ये कंपनी टोयोटा 
फॉर्च्युनर, इनोव्हा क्रिस्टा आणि हायराइडर इत्यादी प्रसिद्ध कारची निर्मिती करते.  
Edited by - Priya Dixit