बांगर, राजेश नार्वेकर यांच्यासह १२ वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार राज्य सरकारने राज्यातील १२ वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. बदल्या करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये अश्विनी भिडे, अभिजित बांगर, राजेश नार्वेकर या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या करण्यात आलेल्या बदल्यांबाबत समोर आलेल्या माहितीनुसार जलजीवन मिशनचे अभियान संचालक अमित सैनि यांची नियुक्ती अतिरिक्त आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका या पदावर करण्यात आली आहे. संजय मीना यांची नियुक्ती महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या पदावर करण्यात आली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांची नियुक्ती आयुक्त, सहकार व निबंधक, सहकारी संस्था पुणे या पदावर करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे या पदावर करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांची नियुक्ती अतिरिक्त महापालिका आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका या पदावर करण्यात आली आहे. तर जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा या पदावर करण्यात आली आहे.
स्मार्ट सिटी पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या पदावर करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक , मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन या पदावर करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे या पदावर करण्यात आली आहे. धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव या पदावर करण्यात आली आहे. स्मार्ट सिटी नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी यांची नियुक्ती अतिरिक्त आयुक्त, पुणे मनपा या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुमार खेमनार यांची नियुक्ती आयुक्त, साखर, पुणे या पदावर करण्यात आली आहे.
Edited By -Ratnadeep Ranshoor