शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 13 मार्च 2023 (07:51 IST)

आदिवासीच आहेत जग, जंगल आणि जंगली इथे ते खरे मालक आहेत

sharad pawar
ते आदिवासीच आहेत. जग, जंगल आणि जंगली इथे ते खरे मालक आहेत, असे रोखठोक मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ११०व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते.
 
"हल्ली बऱ्याच लोकांचे आदिवासींसंबंधीचे ज्ञान हे एकादृष्टीने अज्ञानच आहे अशाप्रकारची प्रचिती येते. आजही या देशातील, राज्यातील वनसंपत्ती आदिवासींनी सांभाळलेली आहे. हा खरा त्यांचा अधिकार आहे. ते त्यांचे कर्तृत्व आहे. त्यांच्या हिताची जपणूक करण्यासाठी, त्यांचे अधिकार जतन करण्यासाठी अजूनही लोक प्रयत्नांची पराकाष्ठा करतात याचे मला समाधान आहे," असेही ते म्हणाले.
 
"आदिवासींच्या हिताची जपणूक करण्यासाठी विशेष लक्ष देऊन काम करण्याची आवश्यकता आहे. हे ध्यानात घेऊन आज ती जबाबदारी सगळ्या सहकाऱ्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. मध्यंतरी वर्धा येथील सेवाग्राममध्ये आदिवासींमध्ये काम करणारे आदिवासी गावाचे गावप्रमुख यांचे एक संमेलन घेतले होते. शेकडो लोक व भगिनी होत्या. आपल्या गावाच्या हिताची जपणूक करण्यासाठी कष्ट करायला कुठलीही कमतरता नाही या गोष्टी पदोपदी त्या सांगत होत्या. आणि त्या रस्त्याने जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांच्या पाठीशी ही सगळी शक्ती उभी आहे. त्यांच्या पाठीशी चव्हाणसेंटर उभे राहिल आणि उपेक्षित माणसाला साथ देईल," अशी खात्री शरद पवार यांनी यावेळी दिली.
Edited by : Ratnadeep Ranshoor