1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 डिसेंबर 2021 (21:19 IST)

त्र्यंबक पुरोहित हाणामारीला वेगळे वळण, सात जणांना अटक

Trimbak priest clashes turn different
त्र्यंबकेश्वर मध्ये होत असलेल्या विविध पूजेवरून पुन्हा पुरोहितांच्या दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही गटातील एकूण सात जणांना अटक केली आहे.
त्र्यंबकेश्वरला विधी करण्यासाठी यजमान पळविल्याने नाशिकच्या पंचवटी परिसरातील हिरावडी येथे दोन पुजाऱ्यांमध्येच हाणामारी झाल्याच समोर आले आहे. यावेळी एका पुजाऱ्याने स्वतः कडील गावठी कट्टाच दुसऱ्या पुजाऱ्यावर रोखला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी सात संशयितांना पंचवटी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.
त्र्यंबकेश्वरला पूजा विधी करण्यासाठी आलेल्या यजमानांना पळविल्याच्या कारणावरुन ही घटना घडल्याची माहिती आहे. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी तात्काळ अतिरिक्त पोलीस कुमक बोलावून हस्तक्षेप करत ही हाणामारी रोखली. तर पुजाऱ्यांच्या मोटारीची पोलिसांनी झडती घेतली असता कारमधून एक गावठी कट्टा व अकरा जीवंत काडतुसे हे पोलिसांना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.