1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 28 जून 2024 (12:08 IST)

तुकाराम महाराज पालखी आज निघणार

सर्व संतांच्या पालख्यांना आषाढ महिना लागताच पंढरपूरकडे जाण्यासाठी ओढ लागते. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकरीलोक अनेक किलोमीटरचा प्रवास करून पंढरपूरला जातात, जाणून घेऊ या तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थांची वेळ.
 
महाराष्ट्र ही संतांची भूमी मनाली जाते. मायभूमी महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेलेत त्यांनी नेहमी समाजाला मोलाची शिकवण दिली आहे. जगावे कसे हे शिकवले, भक्ती शिकवली. तसेच पायावरी ही महाराष्ट्राचे आकर्षण असून वारकरी ही परंपरा मनापासून पाळत आहे. तसेच आषाढ महिना येताच सर्व वारकरींना ओढ लागते ती पंढरपूरची. अनेक मैल प्रवास करून सर्व वारकरी भक्तमंडळी विठूमाऊलीच्या दर्शनाला जातात. या पायवारीचा अनुभव खूप अदभूत असतो. 
 
अनेक संतांच्या पालख्या वारी निमित्त विठ्ठलाच्या दर्शनाला जायला निघतात. तर आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी या सर्व पालख्या एकत्रित होतात व एकेमकांची भेट घेतात. 
 
तसेच संत तुकाराम महाराज्यांची पालखी देखील यामधील प्रमुख पालखी आहे. यंदा 339 वर्षे संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आहे. या पालखीचे प्रस्थान पंढरपूरकडे आज म्हणजे 28 जूनला होणार आहे. तर हे प्रस्थान देहू येथील इनामदार साहेब वाडा येथून होणार आहे.