गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 जानेवारी 2021 (07:14 IST)

तुकाराम मुंढे यांच्याकडे राज्य मानवाधिकार आयोगाच्या सचिवपदाची जबाबदारी

राज्य सरकारने तुकाराम मुंढे यांच्याकडे राज्य मानवाधिकार आयोगाच्या सचिवपदाची जबाबदारी सोपवली आहे. २००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या तुकाराम मुंढे यांची नागपूरच्या आयुक्तपदावरून काही महिन्यांपूर्वी बदली झाली होती. त्यानंतर तुकाराम मुंडे यांच्याकडे कुठल्याही विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली नव्हती. त्यामुळे ते पदभाराविना होते.
 
दरम्यान,जाहीर झालेल्या अन्य नियुक्त्या आणि बदल्यांमध्ये एमपीसीएलचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद कुमार यांची सहकार, मार्केटिंग आणि वस्त्रोद्योग विभाहाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर डी.बी. गावडे यांची सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संयुक्त सचिवपदी नियुक्त करण्यात आली आहे. तसेच उदय जाधव यांची महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगामध्ये सचिवपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.