शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020 (10:33 IST)

दोन महिन्यांच्या बाळाला आई वडिलांनी टाकून दिले, पोलीस घेतला शोध

पुण्यातल्या खडकी येथे अपत्य आपलं नाही असा दावा करत दोन महिन्यांच्या बाळाला त्याच्या वडिलांनी नाकारल्याने आणि यावरुन सतत होणाऱ्या वादाला कंटाळलेल्या आईने त्याला रस्त्यावर सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या बाळाच्या आई-वडिलांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतलं आहे.
 
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी पती-पत्नीला बाळ झाल्याने त्यांच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण होते. सर्व काही ठीकठाक सुरु असताना अचानक पती हे बाळ माझं नाही असे म्हणत पत्नीशी भांडू लागला. सततच्या होणार्‍या या भांडणाला कंटाळून अखेर त्या दोघांनी बाळाला सोडून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार खडकी येथील बसस्टॉप जवळ दोन महिन्यांच्या बाळाला त्याची आई रस्त्यावर सोडून गेली. एवढ्याशा बाळाला रस्त्यावर सोडून गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, पोलिसांनी काही तासांत बाळाच्या आई वडिलांचा छडा लावण्यात यश मिळवले.