रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (14:46 IST)

६ व ७ वर्षांच्या दोन बहिणींवर अत्‍याचार, जळगाव हादरलं

जळगाव तालुक्‍यात दोन अल्पवयीन बहिणींवर एका तरूणाने लैंगिक अत्‍याचार केल्‍याची संतापजनक घटना घडली आहे. नशीराबाद पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर संशयित तरुणाला अटक करण्यात आली.
 
तालुक्यात (६ वर्ष) आणि (७ वर्ष) वयाच्या दोन बहिणी कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. बुधवारी सायंकाळी त्याच गावात राहणारा तरुण चिमुकल्या मुलींच्या घरी आला होता. यावेळी घरात चिमुकल्या मुलींव्यतिरिक्त कोणी नव्हतं. यावेळी आरोपीनं संधी साधून पीडित मुलींवर त्यांच्याच घरात अत्याचार केला. अत्याचारानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाला. 
 
चिमुकल्या बहिणींनी त्याच्यासोबत घडलेला प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला. पिडीत मुलींच्या कुटुंबियांनी नशीराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन अत्याचारासह पोक्सो कलमान्वये तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरु आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे.