1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Two students drowned in deep water in Nampur Nashik

खाजगी कोचिंग क्लासच्या गणपतीला अखेरचा निरोप देण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा धरणात बुडून मृत्यू

नाशिकच्या नामपूर येथे गणपती विसर्जनानंतर मोसम धरणात उतरलेले दोन १७ वर्षीय विद्यार्थी खोल पाण्यात बुडाले. बचाव पथकांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढले.
 
नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात नामपूर येथे गणपती विसर्जनादरम्यान एक भीषण अपघात घडला. गणपती विसर्जनासाठी मोसम धरणावर गेलेले दोन विद्यार्थी पोहण्यासाठी पाण्यात उतरले आणि दुर्दैवाने बुडून मरण पावले. मृत विद्यार्थ्यांची ओळख अथर्व दीपक पागर १७ आणि प्रसाद दादाभाऊ वाघ १७ अशी पटली आहे.
माहितीनुसार, एका खाजगी कोचिंग क्लासने विद्यार्थ्यांसाठी गणपती विसर्जन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी, गणपतीला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी मोसम धरणावर पोहोचले होते. विसर्जन सोहळा पार पडल्यानंतर, काही विद्यार्थ्यांनी उत्साहाच्या भरात धरणाच्या पाण्यात उडी मारली. याचवेळी, दोन विद्यार्थी खोल पाण्यात गेले आणि बुडू लागले. इतर विद्यार्थ्यांनी आणि जवळच्या लोकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण दोघेही पाण्यात दिसेनासे झाले. घटनेची माहिती मिळताच, स्थानिक बचावकार्य सुरू करण्यात आले आणि मालेगावहून बचाव पथकांना पाचारण करण्यात आले. बचाव पथकांनी शोधमोहीम सुरू करून दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले.  
 
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: 
 
पुढील लेख
शरद पवारांच्या सूचनांचे स्वागत करत देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र सरकार दुष्काळाचा सामना करण्यास तयार