शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 12 जून 2021 (15:51 IST)

भोसरीत दोन वाहने फोडली, सहा जणांवर गुन्हा

Two vehicles
शास्त्री चौक, भोसरी याठिकाणी रस्त्यालगत मोकळ्या जागेत उभी केलेली दोन वाहने टोळक्याने फोडली. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
आरमान देशमुख, सनी चिवे (दोघेही रा. कासारवाडी) व इतर चार अनोळखी तरूणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याप्रकरणी वैजनाथ सदाशिव आडागळे (वय 52, रा. पारिजात कॉलनी, पिंपळे गुरव) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा ट्रक (एमएच 14 / व्ही 0592) हा विसावा हॉटेलसमोरील मोकळ्या जागेत पार्क केला होता. या ट्रकच्या काचा आरोपींनी फोडल्या. तसेच, राजेश वाटकर यांच्या मालकीची कारच्या (एमएच 14 / एच क्यू 2421) देखील काचा फोडून नुकसान केले. सहाय्यक पोलीस फौजदार केके बुढे अधिक तपास करीत आहेत.