1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Two-year-old girl dies in balloon explosion

फुगा घेताना स्फोट,दोन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातल्या शिंदी बुद्रुक इथं बैल पोळ्यानिमित्ताने यात्रा होती. या यात्रेत गॅसचे फुगे विकणाऱ्याकडील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने दोन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला.
 
या घटनेत दोन वर्षांची भार्गवी उर्फ परी सागर रोही ही आपले आजोबा रवींद्र किसनराव रोही यांच्यासोबत शनिवारी संध्याकाळी गावातीलच यात्रेत गेली होती. उडणारा फुगा बघून भार्गवीने आपल्या आजोबांकडे फुगा घेण्याचा हट्ट धरला. परीला घेऊन आजोबा फुगे विक्रेत्याजवळ पोहोचले. फुगा विक्रेता फुग्यात गॅस भरत असताना अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोट इतका भीषण होता की भार्गवी जागीच कोसळली.
 
गंभीर जखमी झालेल्या भार्गवीला तात्काळ अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण रुग्णालयात आणण्यापूर्वीच तिची प्राणज्योत मालवल्याचं उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुरेंद्र ढोले यांनी सांगितलं.
पुढील लेख
Raj Thackeray Meets Fadnavis: राज ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट, चर्चेला उधाण