उदयनराजे भडकले; म्हणाले – ‘काय…येड्या सारखं बोलताय’
आपल्या रोख ठोक भुमिकेमुळे उदयनराजे नेहमीच चर्चेत असतात. सध्या सातारा जिल्हा बँकेची रणधुमाळी सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांनी वार्तालाप केला. दरम्यान यावेळी चर्चा सुरु असताना एका पत्रकाराने राजकीय दबावाला बळी पडून जिल्हा बँकेनं जरंडेश्वरला कर्ज वाटप केलंय असं आपणाला म्हणायचं आहे असा प्रश्न उपस्थित करताच उदयनराजे भडकले. ते म्हणाले, काय…येड्या सारखं बोलताय. लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात तुम्ही. प्रश्न विचारताना भान ठेवा. आम्ही जे बोलतो ते लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवता. त्यामुळे उदयनराजे किती खरे आणि किती खोटे हे तुम्हीच लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे.अन्यथा, बँकेतील शेतकरी सभासद देशोधडीला लागतील, असा इशाराच त्यांनी दिला.
उदयनराजे म्हणाले की, कर्ज वाटपाबाबत अनियमितता आहे कि नाही हे माहिती नाही. पण मला माहित असत तर शेपूट घालून बसणार नाही. मी उघडपणे सर्व काही सांगितलं असत. मी तत्व जपली असून तत्वाला गालबोट लावून घेणार मी नाही. समजा जरंडेश्वरच्या कर्जाची वसुली निघाली तर सगळे म्हणणार की हे ही भ्रष्ट आहेत. माझं म्हणणं आहे की, या सर्व लोकांचं १० वर्षाचं रेकॉर्ड बघावं त्यावरून लक्षात येईल कोण कसं वागलं. काही झालं की उदयनराजेंकडे येतात. न्याय मागतात. मी दबाव टाकतो का, मी समाजाच्या पे स्केलवर आहे का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.