1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 27 ऑक्टोबर 2021 (16:03 IST)

वानखेडेंना दुहेरी दणका; NCB नं चौकशी सुरु करण्यापूर्वीच अडचणीत वाढ

क्रूझ शिपवरील ड्रग्स पार्टीची चौकशी करत असलेले एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंच्या  अडचणी वाढल्या आहेत. एनसीबीकडून (NCB) वानखेडेंची खाते अंतर्गत चौकशी होणार आहे. त्यासाठी एनसीबीचं पथक मुंबईत दाखल झालं आहे. परंतु त्यापूर्वीच समीर वानखेडेंची  मुंबई पोलिसांकडून चौकशी  होण्याची शक्यता आहे. सहायक पोलीस आयुक्त(ACP)  दर्जाच्या अधिकाऱ्याकडून वानखेडे यांची चौकशी होणार आहे. आर्यन खान अटक प्रकरणात 8 कोटी रुपये मिळणार होते, असा गंभीर आरोप साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईल यानं केला आहे. याच आरोपांची चौकशी मुंबई पोलीस वानखेडे यांच्याकडे करणार आहे.
 
क्रूझवरील कारवाईदरम्यान उपस्थित असलेले पंच प्रभाकर साई यांनी समीर वानखेडे यांच्यासह इतरांवर गंभीर आरोप केले आहेत. त्याचा प्राथमिक तपास पोलिसांनी सुरु केला आहे. मंगळवारी रात्री प्रभाकर साईल यांचा जबाब रेकॉर्ड कॅमेऱ्यात करण्यात आला. डीसीपी (DCP) दर्जाच्या अधिकाऱ्यानं साईल यांचा जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर तपासाला सुरुवात झाली. सध्या मुंबई पोलीस इलेक्ट्रॉनिक पुराव्यांचा तपास करत आहेत.
 
साईल यांनी त्यांच्या जबाबात एका जबाबदार व्यक्तीचेन नाव आणि ठिकाणं यांचा उल्लेख केला आहे.त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन ते तपासण्यात येणार आहेत.तसेच प्रभाकर यांच्या फोनचं लोकेशन देखील तपासण्यात येणार आहे.प्रभाकर यांनी पैशांच्या व्यवहारांचा उल्लेख केला आहे. ज्या ठिकाणी या व्यवहाराबद्दल चर्चा झाली, त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जातील.यानंतर प्राथमिक अहवाल तयार करुन तो सादर केला जाईल.त्यानंतर या प्रकरणी एफआयआर  दाखल करायची की नाही, याचा निर्णय घेतला जाईल.