गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 27 ऑक्टोबर 2021 (14:13 IST)

दुर्देवी ! कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर सापडलेल्या 'त्या' चिमुकलीचा मृत्यू

औरंगाबाद शहरातील किराडपुरा परिसरात रविवारी एका उघड्या कचऱ्याच्या ढिगारावर एक लहान बाळ आढळून आले. हे बाळ त्या परिसरात  खेळत असलेल्या मुलांना दिसले त्यांनी याची माहिती धावत जाऊन आपल्या मोठ्यांना सांगितली  नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना तिथे स्त्री जातीचे हे अर्भक आढळले. नागरिकांनी तातडीने पोलिसांना बोलवून  बाळा ला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान हे बाळ दगावले. पोलिसांनी या चिमुकलीच्या मातेचाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलीस या चिमुकलीला कचऱ्याच्या ढिगारात फेकून जाणाऱ्या मातेचा शोध घेत आहे. या चिमुकलीचा असा दुर्देवी अंत झाल्यामुळे हळहळ व्यक्त  होत आहे.