गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 20 जुलै 2022 (08:11 IST)

उद्धव ठाकरेंचा रामदास कदम यांना टोला, 'रडण्याचे ढोंग करू नका

uddhav thackeray
"शिवसेनेच्या विरोधात कारवाया करायच्या त्या तुम्ही केल्या. आता रडण्याचे ढोंगसोंग करू नका. शिवसैनिक तुम्हाला पुरते ओळखून आहे," असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
 
"आता त्या ईर्षेने आणि जिद्दीने मी उभा राहिलो आहे. ही इर्षा केवळ आणि केवळ तुमच्या भरवश्यावर आहे. तुम्ही सोबत असल्यास मला कशाचीही पर्वा नाही. समोर भाजपा असू दे की हे गद्दार नामर्द असू दे. मला त्यांची पर्वा नाही. ते काही काळ सत्ता उपभोगतील. पण जेव्हा भाजपाला कळेल हे काडीच्या कामाचे नाहीत, तेव्हा भाजपा त्यांना फेकून देईन," असे उद्धव ठाकरे म्हणाले.
 
"मागितले तर मी काहीही देईन. पण हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, तर मात्र त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आता त्यांनी निवडणुकीला सामोरे जावे आणि मते मिळवावी. पण ही हिंमत यांच्यात नाही. कारण हे खरे मर्दच नाहीत. दुसऱ्यांचा पक्ष चोरणे, दुसऱ्यांची चिन्हे चोरण्याचा प्रयत्न करणे, मात्र ते चोरले जाऊच शकत नाही. याला हिंमत लागते," असं ठाकरे म्हणाले.