रविवार, 1 ऑक्टोबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 8 मे 2023 (07:32 IST)

भगव्याला डाग लावणाऱ्यांना मातीत गाडणार - उद्धव ठाकरे

महाड  : काही जणांना माझ्यावर टीका केल्याशिवाय जेवण मिळत नाही.खोके घेऊन हे मोठे झाले आहेत. भगव्याला डाग लावणाऱ्यांना मातीत गाडणार. कोकणाच वैभव का मारत आहेत. बारसू प्रकल्पावर स्थानिकांशी का चर्चा करत नाहीत? प्रकल्प चांगला असेल तर लाट्या  का चालवता? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी महाड सभेवेळी बोलताना केला. महाराष्ट्र सोडून मुख्यमंत्री बाहेर फिरत आहेत. मुख्यमंत्री दिल्ली, गुजरातच्या वाऱ्या करत आहेत. लाचार कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भांडी घासायला गेले आहेत. असा घनाघात उद्धव ठाकरे यांनी केला.यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर तीव्र शब्दात निशाणा साधला. संपूर्ण महाराष्ट्र बारसूत उतरेल असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
 
पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, महाड मतदार संघ सेनेचा आहे. शिवसेनेला पेटवण्याचा प्रयत्न करू नका. शंभर वेळा बोलले लोकांचे मनातील बात कुठे आहे?. बजरंग बली चे नाव घेऊन मतदान करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले. मोदींनी केलेला हा धार्मिक प्रचार नाही का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
Edited by : Ratnadeep Ranshoor