शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 सप्टेंबर 2022 (08:19 IST)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरेंची जाहीरपणे स्तुती केली

nitin gadkari
राज ठाकरे हे सध्या पाच दिवसीय विदर्भ दौऱ्यावर असून, या दौऱ्यात ते अनेक गाठीभेटी घेणार असुन, उद्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन चर्चा करणा आहेत. आज राज ठाकरे यांनी नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं आहे. दरम्यान, नितीन गडकरींच्या आग्रहास्तव राज ठाकरे यांनी नागपुरमधील फुटाळा तलाव आणि संगीत कारंजांचा ‘लेझर शो’ पाहिला. या कार्यक्रमानंतर बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरेंची जाहीरपणे स्तुती देखील केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाल्याचे दिसत आहे.
 
यावेळी नितीन गडकरी यांनी म्हणाले की “कुंचल्यापासून ते साहित्यापर्यंत, कार्टुनपासून ते संगीतापर्यंत सगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ असे ते(राज ठाकरे) कलाकार आहेत. विशेष आनंदाची गोष्ट अशी आहे, की ज्यांच्या नावाने आपण या कारंजांचे नाव स्वर्गीय लता मंगेशकर असं करणार आहोत. त्या स्वर्गीय लता मंगेशकर यांच्याशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे आणि जवळचे संबंध होते. त्यांचं राज ठाकरेंवर पुत्रवत प्रेम होतं. म्हणून आज जेव्हा ते नागपुरात आले तेव्हा त्यांना मी आमंत्रित केलं आणि मला खूप आनंद आहे की ते इथे आले. राज ठाकरे हे कलाकर आहेत, ते इथे आले आणि त्यांनी हे बघितलं. कलेच्या क्षेत्रातील त्यांचं स्थान मोठं आहे.”