आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा बुधवारी ऑनलाईन दीक्षांत समारंभ
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा एकविसावा दीक्षान्त समारंभ बुधवार, दि. 02 मार्च 2022 रोजी नाशिक येथे ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे.
याबाबत अधिक माहिती देतांना विद्यापीठाचे कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प. यांनी सांगितले की, विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन संपन्न होणार आहे. या समारंभास विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य खात्याचे मंत्री मा.नामदार श्री. अमित देशमुख, केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे आरोग्य संशोधन विभागाचे मा. सचिव प्रा. डॉ. बलराम भार्गव आदी मान्यवर ऑनलाईन उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती देतांना कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभ भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधन झाल्याने तो स्थगित करण्यात आला होता. मा. कुलपती कार्यालयाकडून प्राप्त आदेशानुसार सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून या दीक्षांत समारंभ ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. विविध विद्याशाखांच्या पदवीका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासियता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या 10236 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहेत. विविध विद्याशाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्यांना 98 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, एक रोखरक्कम पारितोषिक व 38 विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले की, कोविड-19 सदंर्भात शासनाने आदेशित केलेल्या सूचनांप्रमाणे विद्यापीठाचा एकविसावा दीक्षांत समारांभाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने सर्व महाविद्यालय प्रमुख व प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना सूचीत करावे असे त्यांनी सांगितले.
दीक्षात समारंभाचे विद्यापीठ अधिसभागृहात सकाळी 11.00 वाजता आयोजन करण्यात आले असून या समारंभाचे ीजजचेरूध्ध्जण् रपव ध् डन्भ्ैबवदअवबंजपवद वरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. विद्यापीठाचे संलग्नित महाविद्यालय, शिक्षक, विद्यार्थी, पालक व अभ्यागतांनी सदर दीक्षांत समारंभाचे प्रक्षेपण ऑनलाईन पहावे असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात येत आहे.