राज्यावर अवकाळी पावसाचं संकट!
अवकाळी पावसाने मार्चपाठोपाठ एप्रिलमध्येही अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पावसाचे चक्र मे महिन्यातही असेच सुरू राहिले तर, त्याचा आगामी मॉन्सूनवर विपरित परिणाम होऊ शकतो. परिणामी पावसाळ्यात पर्जन्यवृष्टी कमी होऊ शकते किंवा मधल्या काळात मोठा खंड पडू शकतो, असे हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे. ही विचित्र स्थिती विदर्भातील बळीराजासाठी निश्चित धोक्याची घंटा आहे.
गेल्या 35 वर्षांपासून हवामानाचा अभ्यास करीत असलेले चंद्रपूरचे हवामानतज्ज्ञ प्रा. चोपणे म्हणाले, मॉन्सूनचा पाऊस साधारणपणे उन्हावर अवलंबून असतो. विदर्भात जेवढे कडक ऊन व जीमन तापेल, तेवढा पावसाळ्यात अधिक पाऊस पडतो. दुर्दैवाने यंदा आतापर्यंत तरी तीव्र उन्हाळा जाणवला नाही. मध्यला काळातील दोन तीन दिवसांचा अपवाढ वगळता अख्ख्या एप्रिल महिन्यात पाऊस व ढगाळ वातावरण होते. त्या अगोदर मार्चमध्येही कमी अधिक प्रमाणात असेच वातावरण होते. विदर्भात आणखी आठवडाभर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.