1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 एप्रिल 2023 (07:53 IST)

राज्यात पुढील 5 दिवस अवकाळी पाऊस;हवामान विभागाचा अंदाज

rain and hot
राज्यात पुढील 5 दिवस अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाने झोडपण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी गारपिटीचाही अंदाज आहे. 13 आणि 15 एप्रिल रोजी काही ठिकाणी गारपीठीची शक्यता आहे. तर विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.
 
नाशिक जिल्ह्यात गारपीठीने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिककडे रवाना झाले आहेत. या ठिकाणी नुकसान झालेल्या शेतीचा पंचनामा करून त्यांना मदत जाहीर करणार असल्याचे याआधीच शिंदे यांनी सांगितले आहे.
 
दरम्यान, विदर्भात आज हलक्या सरी बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे, तर मराठवाड्यात शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor