राज्यात 7 जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर, बळीराजा चिंतेत
सध्या सर्वत्र उन्हाळा सुरु आहे. राज्यातील 7 जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा कहर झाला आहे. अवकाळी पावसामुळे बळीराजाचे मोठं नुकसान झालं आहे.
राज्यातील कोकण, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस कोसळला आहे. या मुळे नागरिकांचा गोंधळ उडाला आहे. सोलापूर, नांदेड, सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे.
सांगली जिल्ह्यात पावसाचा तडाखा मिळाला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे बार्शी तालुक्यातील राळेरास मध्ये टरबुजाच्या बागेत नुकसान झाले आहे. सोलापुरात बार्शी येथे द्राक्षाच्या बागेचे मोठे नुकसान झाले आहे.
राज्यात हवामान खात्यानं पावसाचा यलो अलर्ट दिला होता. अवकाळी पाऊसाने शेतीला चांगलाच फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बळीराजा चिंतेत आहे. पावसामुळे पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.
Edited By - Priya Dixit