बुधवार, 15 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 31 ऑगस्ट 2024 (13:14 IST)

Cyclone Asna:48 वर्षांनंतर विनाशकारी चक्रीवादळ 'आसना' येत आहे, हवामान विभागाचा इशारा

अरबी समुद्रातील एका असामान्य चक्रीवादळाने गुजरातची किनारपट्टी ओलांडली असून हवामान शास्त्रज्ञानीं याला दुर्मिळ घटना म्हणून वर्णले आहे. ही घटना 1976 नंतर पहिल्यांदाच घडली आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार झाले आहे. 

हवामान विभागाचे तज्ञ सांगतात की, 1976 मध्ये ओडिशातून चक्रीवादळ निघाले ते पश्चिम- वायव्येकडे सरकले आणि अरबी समुद्रात दाखल झाले आणि ओमान किनाऱ्याजवळ वायव्य अरबी समुद्रात कमकुवत झाले

थंड समुद्राचे तापमान आणि अरबी द्वीपकल्पातून येणारी कोरडी हवा यामुळे पश्चिम अरबी समुद्र चक्रीवादळ निर्मितीसाठी प्रतिकूल आहे. ही परिस्थिती बंगालचा उपसागर आणि पूर्व अरबी समुद्रातील चक्रीवादळ अनुकूल वातावरणाच्या अगदी विरुद्ध आहेशास्त्रज्ञांनी चक्रीवादळाच्या प्रकाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले, या आसनी चक्रीवादळाची घटना अभूतपूर्व आहे. 
Edited by - Priya Dixit