मंगळवार, 13 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 17 नोव्हेंबर 2018 (09:50 IST)

तर वाहन चालकाचा परवाना रद्द होईल

vahan chalak
गुटखा, पानमसाला, सुगंधी सुपारी, सुगंधी तंबाखू, खर्रा यांसारख्या पदार्थांच्या वाहतुकीसाठी वाहन चालकाचा परवाना रद्द करण्यावर येणार आहे. याबाबतच्या राज्य सरकाने अन्न व औषध प्रशासनाच्या यासंबंधीच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला आहे. वाहन कायदा 1988 नुसार हा परवाना रद्द करण्याची तरतूद आहे. त्यामुळे या कायद्यान्वये वाहन चालकांचा परवाना रद्द करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. 
 
यापुढच्या काळात बाहेरील राज्यातून गुटखा तसेच प्रतिबंधक अन्नपदार्थ आणणार्‍या वाहनांवर कारवाई करतानाच ही प्रकरणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठविण्याच्या सूचना अन् न, औषध प्रशासनाने राज्यातील कार्यालयांना दिल्या आहेत. नुकतेच याबाबचे परिपत्रक अन्न, औषध प्रशासनाने जारी केले आहे.
 
अन्न व औषध प्रशासनाच्या राज्यातील टीमने गुटखा आणि प्रतिबंधित अन्न पदार्थाची वाहतूक करणाऱी वाहने जप्त केल्यानंतर ही प्रकरणे प्रादेशिक वाहतूक कार्यालयाला कळवणे अपेक्षित आहे. त्यासाठीचे पत्र आरटीओला पाठवण्याचे या परिपत्रकात नमुद करण्यात आले आहे. अशा वाहनांच्या प्रकरणात आरटीओमार्फत सुनावणी घेण्यात येणार आहे. परवाना जप्त होण्याआधी वाहन चालकाला आपली बाजू मांडण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर या वाहनाचा आणि वाहन चालकाचा परवाना रद्द होणार आहे.