दिल्लीतल्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद, वाचा
आज २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीने वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. हे दिल्लीतल्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ आहे. प्रकाश आंबेडकर आणि पक्षाने राज्यभरात शांततापूर्ण बंदचे आवाहन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीत NEET पेपर लीक प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमार आणि पोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज, २३ जुलै रोजी 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. तसेच या बंद ला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) आणि डाव्या पक्षांनी पाठिंबा दिला आहे हा बंद पूर्णपणे ऐच्छिक (स्वेच्छेने) असून सरकारने कोणतीही अधिकृत सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली नाही.
काय सुरू राहील?
अत्यावश्यक सेवा: रुग्णालये, मेडिकल स्टोअर्स, दूध आणि भाजीपाला पुरवठा सुरळीत सुरू राहील.
सार्वजनिक वाहतूक: मुंबई लोकल ट्रेन आणि सरकारी बसेस सुरू ठेवण्याचा प्रयत्न आहे, मात्र आंदोलनांमुळे काही ठिकाणी वाहतुकीवर अंशतः परिणाम होऊ शकतो.
शाळा आणि महाविद्यालये: राज्य सरकारने शाळा-कॉलेजेस अधिकृतपणे सुरू ठेवले आहे. तथापि, प्रकाश आंबेडकर यांनी पालकांना आपल्या मुलांना सुरक्षिततेसाठी आज शाळेत न पाठवण्याचे आवाहन केले आहे.सरकारी आणि खाजगी कार्यालये: सर्व सरकारी बँका, कार्यालये आणि खाजगी कंपन्या नेहमीप्रमाणे सुरू आहे.
महत्त्वाच्या गोष्टी:
मुंबईत जमावबंदी: २३ जुलै ते ६ ऑगस्टपर्यंत मुंबईत ५ किंवा अधिक लोकांच्या जमावावर बंदी लागू आहे. यामुळे मोर्चे/सभा यावर परिणाम होऊ शकतो. तसेच बंद पूर्णपणे यशस्वी होईल की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. सार्वजनिक वाहतूक, दुकाने, कार्यालये यावर स्थानिक पातळीवर परिणाम होऊ शकतो. अनेक राजकीय पक्ष/संघटना याला समर्थन देत आहे.
Edited By- Dhanashri Naik
