बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 जुलै 2019 (09:30 IST)

वंचित बहुजन आघाडीने आता विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करायला सुरुवात

लोकसभा निवडणुकीत राज्यातील समीकरणे मोठ्बया प्दरमाणात बदल घडवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्या करिता वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेसला लेगेच अल्टिमेटम दिले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला आम्ही ४० जागा सोडत असून, वंचित बहुजन आघाडी विधनसभेच्या २४८ जागांवर निवडणुक लढवणार आहे. त्यांना मंजूर असेल तर त्यांनी येत्या १० दिवसात काँग्रेसने त्यांचे उत्तर द्यावे. काँग्रेसला चर्चा करायची असेल तर अधिकृतपणे आमच्या पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा करावी, असे वंचित बहुजन आघाडीचे सरचिटणीस गोपीचंद पडाळकर यांनी सांगितले आहे. या आगोदर कॉंग्रेस ने वंचित बरोबर आघाडीचे संकेत दिले आहेत. तर लोकसभेत मोठ्या फरकाने वंचित आघाडीने मत मिळवली आहे, त्यामुळे सर्व पक्षांनी त्यांचा धसका घेतला आहे. जरी वंचित बहुजन आगाडीचे उमेदवार निवडणून आले नाहीत तरी त्यांनी राजकीय ताकद दाखवून दिली आहे. बाळासाहेब आंबेडकर याचे नेतृत्व करत आहेत.