शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022 (22:28 IST)

Vedat Marathe Veer Daudale Saat :वेडात मराठी वीर दौडले सात चित्रपटातील मावळ्यांची नावे चुकीची, चित्रपटाला विरोध

Vedat Marathe Veer Daudale Saat : चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा सिनेमा 'वेडात मराठे वीर दौडले सात ' या चित्रपटाचा सर्वत्र विरोध केला जात आहे. कोल्हापुरात मावळ्यांची नावे बदलल्याने तीव्र विरोध केला जात आहे. चित्रपटात जुना आणि सोनेरी इतिहास मोडतोड केल्याने आंदोलन करण्यात येत आहे. कोल्हापुरातील गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी गावातील खिंडीत गुर्जर आणि खानांमधील युद्धात प्रताप राव गुजर यांनी सात मावळ्यांसह मोठा पराक्रम केला होता. चित्रपटात नावे बदलून इतिहासाची मोडतोड करून दाखवण्यात आली असून मावळ्यांची पोषाखे वेगळी दाखवण्यात आली आहे. चित्रपटात दाखविण्यात आलेल्या काल्पनिक नावांचा विरोध ग्रामस्थांनानी केला आहे.

नेसरीकर गावकरांनी महेश मांजरेकर यांना खरा इतिहास समजून घ्यावा आणि इतिहासाची मोडतोड करू नये अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचा इशारा दिला आहे. नेसरीच्या भूमीत सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी सात मावळ्यांसह बलिदान दिले.या चित्रपटाला छत्रपती संभाजी राजे यांनी देखील विरोध केला आहे. या चित्रपटाची मावळ्यांची पोशाख वरून ते म्हणाले की, या मावळ्यांची पोशाख पहा , हे मावळे आहे का ?'सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली काहीही दाखवलं जाते. इतिहासाशी मोडतोड करणाऱ्यांनी समजावं की गाठ माझ्याशी आहे.' या चित्रपटात इतिहासाची मोडतोड करून इतिहासाचा विपर्यास केला आहे. असा आरोप छत्रपती संभाजी राजे यांनी केला आहे.  
 
Edited by - Priya Dixit