रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (16:58 IST)

भारतीय सेनेचे जवान गणेश सोनवणे यांना वीरमरण

भारतीय सेनेचे जवान जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील पंतोडा गावाचे भूमिपुत्र  जवान गणेश सोनवणे यांना जम्मू काश्मिरात देशसेवेचे कर्तव्य बजावताना वीरमरण आले.त्यांचा अपघाती मृत्यू झाला.ते त्यावेळी आपले देशसेवेचे कर्तव्य बजावत होते. अपघातात ते जबर जखमी झाले.त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले .उपचाराधीन असताना त्यांची प्राणज्योत मालवली.ते 36 वर्षाचे होते. ते या महिन्याच्या अखेरीस भारतीय सेनेतून निवृत्ती घेणार होते.त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप  घातली आणि त्यांना वीरमरण आले.
 
त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी,आई, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या कुटुंबियांना कळविण्यात आली आहे.त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. काही दिवसापूर्वीच त्यांनी आपल्या मुलीशी संभाषण करताना तिला सांगितले की,मी या महिन्या अखेर निवृत्त झाल्यावर आपण सर्वजण एकत्र राहू आणि चारचाकीतून फिरून मज्जा करू.पण नियतीच्या मनात काही औरच होते.आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या निधनाची बातमी कुटुंबाला दिली. त्यांचे पार्थिव त्यांच्या नाशिकच्या अंबड येथील निवासस्थानी बुधवारी आणण्यात येईल जिथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्य संस्कार करण्यात येणार आहे.