मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (15:43 IST)

कृषी मंत्र्यांच्या मालेगावात शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी केली अमानुष मारहाण

कृषिमंत्री दादा भुसे यांच्या गावात शेतमाल विकायला आलेल्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनीअमानुष मारहाण केली आहे. मालेगाव बाजार समितीतल्या सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला आहे.
 
कृषिमंत्री दादा भुसे यांचे गाव म्हणून सध्या तरी मालेगावची विशेष ओळख आहे. याच मालेगावमध्ये माल विकायला आलेल्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी चक्क अमानुष मारहाण केल्याने खळबळ उडाली आहे. यात  दिलीप पवार आणि ताजमल पवार हे शेतकरी मालेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत माल विकायला आले होते. मात्र, त्यांचे तिथल्या व्यापाऱ्यांशी खटके उडाले. त्याचे रूपांतर वादावादीत झाले आणि शेवटी पर्यवसन हाणामारीत झाले. या घटनेत व्यापाऱ्यांनी दिलीप आणि ताजमल यांना मारहाण केली. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पाचोरा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बाजार समिती प्रशासनाने व्यापाऱ्यांना नोटीस काढून खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.