शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 जुलै 2023 (15:07 IST)

Shirish Kanekar Passed Away : ज्येष्ठ पत्रकार शिरीष कणेकर यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन

Shirish Kanekar Passed Away : ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक शिरीष कणेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 80 वर्षाचे होते. आज सकाळी त्यांची प्रकृती खालावली त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते पत्रकार, चित्रपट व क्रिकेट समीक्षक , लेखक आणि एकपात्री कलाकार म्हणून ओळखले जात होते. ते मुळात रायगड जिल्ह्यातील पेण  गावाचे होते.  त्यांचा जन्म 6 जून 1943 रोजी पुण्यात झाला. त्यांनी कायद्याची पदवी मुंबई विद्यापीठातून घेतली. 

शिरिषासन , फिल्लमबाजी हे त्यांचे प्रसिद्ध विनोदी लेख आहे.इंडियन एक्प्रेस, डेली, फ्री प्रेस जर्नल, सिंडिकेटेड प्रेस न्यूज एजन्सी,मध्ये पत्रकार म्हणून काम केलं. तर  लोकसत्ता, सामना, महाराष्ट्र टाइम मध्ये त्यांचे स्तंभलेखन प्रसिद्ध होते. त्यांची रंगमंचीय कारकीर्दही विशेष आहे. 7 नोव्हेंबर 1987 रोजी त्यांनी रंगमंचावर पदार्पण केलं.

भारतीय रंगमंचावर पहिल्यांदा ‘स्टॅन्ड अप कॉमेडी’ कणेकरांनी आणली. लगाव बत्ती त्यांच्या या कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदचा उत्कृष्ट विनोदी वाङ्मयचा ची.वी.जोशी पुरस्कार मिळाला. 

त्यांना कै. विद्याधर गोखले ललित साहित्य पुरस्कार, सर्वोत्कृष्ट वाङ्मयाचा पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांच्या निधनाने पत्रकारिता, साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. 
 
 Edited by - Priya Dixit