रविवार, 2 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 22 जानेवारी 2022 (09:59 IST)

ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचे निधन

Veteran singer Kirti Shiledar passes away ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचे निधन Marathi Regional News In Webdunia Marathi
ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचे वयाच्या 70 व्या वर्षी दीर्घ आजारानंतर पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु असता त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.
 
संगीताच्या क्षेत्रात त्यांनी आपले अमूल्य योगदान दिले आहे. त्यांनी संगीताच्या क्षेत्रात नाट्यसंगीताचा वारसा वाढवला आहे. त्या 2018 साली 98 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी होत्या.  त्यांच्या निधनाने संगीत रंगभूमीवर शोककळा पसरली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.