1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 जानेवारी 2021 (08:28 IST)

विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त

Vijay Vadettiwar's
राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. वडेट्टीवार यांनी त्यांच्याविरोधात दाखल गुन्ह्याची माहिती पासपोर्ट अर्जात लपवल्याचा आरोप आहे. भाजपाचे माजी आमदार मितेश भांगडिया यांनी याबाबत तक्रार केली होती. त्यावरून ही कारवाई करण्यात आली असल्याचे समोर आले आहे.
 
विशेष म्हणजे भांगडिया यांनी, याप्रकरणी मी अनेकदा मुख्यमंत्री व पासपोर्ट कार्यालयाकडे तक्रार केली होती, मात्र कारवाई होत नसल्याने अखेर मला न्यायालयात धाव घ्यावी लागली असल्याचं सांगितलं आहे. भांगडिया यांनी आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. भांगडिया हे विधानपरिषदेचे माजी सदस्य देखील आहेत.