बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 24 जून 2019 (16:48 IST)

हे आहेत नवीन विधानसभा विरोधीपक्ष नेते

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे. मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वडेट्टीवार यांच्या निवडीनंतर सभागृहात त्यांचे अभिनंदन केले. राष्ट्रवादीने विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पाठिंबा दिल्यानंतर विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली. त्यासाठी, विधानसभा अध्यक्षांनी प्रस्ताव ठेवला होता. 
 
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे बंडखोर नेते आणि माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा देत भाजपा सरकारमध्ये गृहनिर्माण मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले होते. या जागेवर काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करावी, अशी मागणी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून झाली होती. विजय वडेट्टीवार यांची निवड झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह, गृहमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही वडेट्टीवार यांचे जागेवर जाऊन अभिनंदन केले.