शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 15 मार्च 2021 (16:34 IST)

'हे’ एकच वाक्य सर्वाधिक वेळा बोलायचा विक्रम राऊतांच्या नावावर नोंदवला जाईल, भाजपचा टोला

एनआयएकडून उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सचिन वाझेंना अटक केली आहे. वाझेंच्या अटकेनंतर भाजपने थेट मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका केली होती. या टीकेला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलेले होते. केंद्रावर निशाणा साधत हा राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. संजय राऊत यांच्या या आरोपानंतर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत सणसणीत टोला लगावला आहे.
 
संजय राऊत यांच्या नावे एकच वाक्य सर्वाधिक वेळा बोलायचा विश्वविक्रम नोंदवला जाईल अंस दिसतंय आणि ते वाक्य असेल ‘हा सरकार अस्थिर करायचा प्रयत्न आहे, असा जोरदार टोला उपाध्ये यांनी राऊतांना लगावला आहे. दरम्यान, भाजपचे टीकेला उत्तर देताना राऊत यांनी केंद्रावर निशाणा साधला होता. केंद्रीय तपास यंत्रणा वारंवार हस्तक्षेप करून मुंबई आणि मुंबई पोलिसांचं खच्चीकरण करत आहे. यंत्रणा राज्यात अस्थिरता निर्माण करत असून, मुंबई पोलीस आणि प्रशासनावर दबाब निर्माण करत आहे, असा आरोप त्यांनी केला होता.