गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मराठी दिन
Written By
Last Updated : शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (12:03 IST)

जागतिक मराठी भाषा दिवस 2021

दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून ओळखला जातो आणि हा दिवस महाराष्ट्र, गोवा,कर्नाटक आणि मध्यप्रदेशाच्या काही भागात साजरा केला जातो. आपले सर्वांचे लाडके 'कुसुमाग्रज 'म्हणजे मराठी चे प्रख्यात कवी, नाटककार,उपसंपादक,कथालेखक विष्णू वामन शिरवाडकर ह्याचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी झाला होता.हा दिवस त्यांची जयंती म्हणून साजरा केला जातो. त्यांचा  मराठी भाषेच्या विकासात मोलाचा वाटा आहे. 
मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे. तब्बल 75 दशलक्ष मूळ भाषेतील ही जगात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. मराठी भाषा दिना निमित्त महाराष्ट्राच्या शासनाने स्थापित केलेल्या शैक्षणिय संस्था मध्ये निबंध आणि परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. 
मराठी भाषा ही मायबोली आहे आपली आपलीशी वाटणारी ही भाषा खूप श्रीमंत भाषा आहे.संतांच्या कीर्तनाने, भजनाने, भारूडाने , ओव्याने ही भाषा सजविली आहे. ह्याला साहित्य आणि इतिहासाची सावली मिळाली आहे.श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज देखील ही भाषा बोलायचे असं करून त्यांनी आपल्या संस्कृतीची जोपासना केली आहे.
आज मराठी माणूस कामानिमित्त जगाच्या कानाकोपऱ्यात वास्तव्यास आहे. त्यामुळे आपल्या मायबोलीला जपणे त्याच्या साठी कठीण झाले आहे.सध्या सगळीकडे इंग्रजी भाषेचे प्रभुत्व आहे.सगळी कडे इंग्रजी भाषेचा सर्रास वापर केला जात आहे. विविध भाषेतून संस्कृती, इतिहास,प्रथा साहित्य शिकायला मिळते.  
सध्या आपल्या शहरी आणि शिक्षित पिढीला मराठी भाषा बोलण्याची लाज वाटते ते हिंदी किंवा इंग्रजी भाषेला प्राधान्य देतात.असे नाही की त्यांनी इतर भाषा बोलू नये. पण त्यांना आपल्या मराठी भाषेचे महत्त्व आणि सामर्थ्य पटवून दिले पाहिजे. त्यांना समजावून दिले पाहिजे की मराठी भाषा किती सुंदर आणि प्रेमळ भाषा आहे आणि आपल्याला आपल्या भाषेचे अभिमान वाटायलाच पाहिजे. 
या दिवशी महाराष्ट्रात आणि जगभरात तसेच देशभरात जिथे जिथे मराठी माणूस आहे. हा दिवस आनंदाने साजरा करतो. या दिनाच्या निमित्ते विविध प्रकारचे मराठी  नाटके, चित्रपट,शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम,काव्य संमेलन,वक्तृत्व स्पर्धा,निबंध सारखे कार्यक्रम योजिले जातात. 
मराठी भाषा दिन ज्याला ''मायबोली मराठी भाषा दिन'','' मराठी भाषा गौरवदिन'' ''जागतिक मराठी राजभाषा दिन'' या नावाने ओळखले जाते.
हा दिवस राज्यसरकारद्वारे नियमित करतात या दिवसाला 'कुसुमाग्रज ' यांचा वाढदिवस म्हणून साजरे करतात. हे मराठीचे प्रख्यात लेखक होते त्यांनी असंख्य कविता, लघुकथा, कादंबऱ्या,निबंध, नाटक,लिहिले आहे. त्यांची विशाका नावाची कविता संग्रह प्रसिद्ध आहे या मधील कविता भारतीय स्वातंत्र्यच्या चळवळीत प्रेरणा देणाऱ्या आहेत. ह्यांना पद्मभूषणासह अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.त्यांचे गाजलेले नाटक नाट्यसम्राट आहे. 
आज आपल्यालाच या श्रीमंत भाषे चा अभिमान बाळगायला पाहिजे आणि आपल्या मायबोली मराठी भाषेची जपणूक केली पाहिजे. आपल्या मनात हे येऊ द्या की ''गर्व आहे मी मराठी असल्याचा ''