शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017 (08:21 IST)

‘बाटू’च्या इंडक्शन प्रोग्रामचे यजमानपद कुलगुरू डॉ. विलास यांची उपस्थिती

नाशिकच्या आयडीया कॉलेजला ‘बाटू’ विद्यापीठाच्या इंडक्शन प्रोग्रामचे यजमानपद मिळाले आहे. शनिवार दिनांक १२ ऑगस्ट २०१७ रोजी कॉलेजमध्येच सदरचा इंडक्शन प्रोग्राम पार पडणार आहे. ‘बाटू’ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास रायकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रोग्राम होणार आहे. सोबतच ‘बाटू’ चे रजिस्टार डॉ. सुनील भामरे, संलग्न प्रमुख डॉ. पी. के. कट्टी यांचीही उपस्थिती लाभणार आहे. सोबतच ‘बाटू’शी संलग्न असलेल्या विविध कॉलेजचे प्रतिनिधी सुद्धा इंडक्शन प्रोग्राममध्ये सहभागी होत आहे. 
 
विद्यावर्धन ट्रस्ट यांच्या इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन इनव्हारमेन्ट अॅण्ड आर्किटेक्चर (Institute for Design Environment and Architecture) अर्थात आयडिया कॉलेज नाशिकमध्ये कार्यरत आहे. काही महिन्यापूर्वी आयडीया कॉलेज डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (बाटू) लोणेरेशी संलग्न झाले आहे. त्यानंतर आता विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून कॉलेजला चालू शैक्षणिक वर्षासाठी होणाऱ्या इंडक्शन प्रोग्राम (induction program) अर्थात प्रेरणा कार्यक्रमाचे यजमानपद मिळाले आहे. यानिमित्ताने पहील्यांदाच ‘बाटू’ चे कुलगुरू डॉ. विलास रायकर नाशिकमध्ये येत आहे. सोबतच ‘बाटू’शी संलग्न असलेल्या दहा विविध कॉलेजचे प्रतिनिधी सुद्धा इंडक्शन प्रोग्राममध्ये सहभागी होत आहे. सदरचा इंडक्शन प्रोग्राम एकाच दिवसाचा असून कॉलेजमध्ये दिनांक १२ ऑगस्ट २०१७ रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होत आहे.
 
सदरच्या इंडक्शन प्रोग्राममध्ये स्थापत्यशास्त्रामध्ये शिकविण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांवर सखोल चर्चा करण्यात येणार आहे. सोबतच इतर क्षेत्रांप्रमाणे स्थापत्यकलेमध्येही नवीन तंत्रज्ञानाचा, डिजिटलाइजेशन वापर वाढला आहे. याकडे पाहाता  नवीन कुठल्या गोष्टी अभ्याक्रमात समाविष्ट करता येतील याचाही आढावा घेण्यात येणार आहे. याशिवाय आधुनिकीकरणांच्या माध्यमातून शिक्षणाच्या दर्जात वाढ, गुणवत्ता सुधारणा, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास, अध्यापन पद्धती यावर चर्चा होणार आहे. यावेळी कुलगुरू डॉ. विलास रायकर उपस्थित प्राध्यापकांशी संवाद साधणार आहेत.
 
आयडीया कॉलेजने सुरुवातीपासूनच पर्यावरणपूरक संकल्पना आणि पेपरलेस कामकाज सुरु केलेले आहे. याचा जवळून अभ्यास करण्याची संधी इतर कॉलेजला मिळणार आह. तर इतर कॉलेजचे उपक्रम आयडीया कॉलेजला पाहाता येणार आहेत.   
 
बाईट विजय सोहनीसंचालक आयडीया कॉलेजनाशिक  
आमच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे की ‘बाटू’चा इंडक्शन प्रोग्राम आमच्या कॉलेजमध्ये होत आहे. अशा कार्यक्रमांमुळे शिक्षकांमधला संवाद वाढतो. वेगवेगळ्या कॉलेजमधल्या उपक्रमांची देवाणघेवाण होऊन विद्यार्थ्यांच्या विकासाला चालना मिळते. अशाप्रकारे उपक्रम वर्षभर राबविले पाहिजे.