शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 जुलै 2021 (16:09 IST)

यंदाही विठ्ठल मंदिरातील विणेकरी यांना उपस्थितीत राहण्याचा मान

आषाढी एकादशी यात्रेनिमित्ताने येत्या 20 जुलैला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते श्री. विठ्ठल रुक्मिणीची महापूजा केली जाणार आहे. या महापूजेच्या वेळी मानाचा वारकरी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत विठ्ठल मंदिरातील विणेकरी यांना उपस्थितीत राहण्याचा मान मिळणार आहे. 
 
मंदिर समितीकडून मंदिरात सेवेसाठी असलेल्या चार विणेकऱ्यांमधून चिठ्ठी उडवून मानाचा वारकरी निवडला जाणार आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेल्या दोन वर्षांपासून आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा रद्द करण्यात येत आहे. त्यामुळे मंदिरातील विणेकऱ्यांमधूनच मानाचा वारकरी निवडला जात आहे.
 
यापूर्वी आषाढी एकादशीच्या दर्शनासाठी रांगेत उभारलेल्या भाविकांमधून वारकरी दाम्पत्याची निवड केली जाते. मुख्यमंत्र्यांसोबतच्या महापूजेला उपस्थित राहण्यासाठी मानाचा वारकरी म्हणून त्या दाम्पत्याकडून पूजा केली जाते, अशी प्रथा वर्षांनुवर्षे चालत आली आहे.