बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (22:12 IST)

विश्व हिंदू परिषदेचे नेते कृष्णकुंजवर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची नुकतीच घोषणा झाली. या घोषणेनंतर विश्व हिंदू परिषदेचे नेते मोहन सालेकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. मुंबईतील कृष्णकुंज या ठिकाणी ही भेट झाली. 
 
“अयोध्या तीर्थक्षेत्र न्यासतर्फे निधी संकलन अभियान सुरू आहे. त्यासाठी आम्ही राज ठाकरे यांच्याकडे माहिती देण्यासाठी आलो होतो. यात त्यांचं सहकार्य मिळावा यासाठी ही भेट होती,” अशी प्रतिक्रिया विश्व हिंदू परिषदेचे नेते मोहन सालेकर यांनी दिली.
 
“अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी मदत निधी जमा केला जात आहे. येत्या मार्चमध्ये राज ठाकरे अयोध्येत जाणार आहे. त्यावेळी राज ठाकरेंकडून कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांना हा निधी देण्यात येणार आहे,” असेही मोहन सालेकर म्हणाले.
 
“हिंदुत्वाची भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे. ती अत्यंत महत्त्वाची आहे. राज ठाकरे यांचे नियोजन कसे करायचे,  हा त्यांचा अधिकार आहे. पण आम्हाला विचारल्यास विश्व हिंदू परिषद आणि संघाकडून त्यांना नक्कीच मदत मिळेल,” असेही मोहन सालेकर यांनी सांगितले.