शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (11:14 IST)

राज्यात ग्राम पंचायतीसाठी आज मतदान

voters
आज राज्यात 1 हजार 165 ग्रामपंचायतीसाठी मतदान होत असून उद्या त्याचा निकाल जाहीर केला जाईल. हे ग्राम पंचायतीसाठी होणारे मतदान सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी देखील आहे. सकाळी 7 वाजे पासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सायंकाळी 5 वाजे पर्यंत हे मतदान होणार असून उद्या याचा निकाल जाहीर होणार आहे.  
 
राज्यात सुमारे 18 जिल्ह्यात 82 तालुक्यात तब्बल 1 हजार 165 ग्राम पंचायतीची निवडणूक होणार असून मतदान केले जात आहे. राज्यात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, सिंधुदुर्ग, पुणे, नंदुरबार, कोल्हापूर, सातारा, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यात ग्राम पंचायतीसाठी मतदान होत आहे. सकाळी 7 वाजे पासून संध्याकाळी 5 वाजे पर्यंत मतदान होणार असून नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजे पर्यंत मतदान होणार असून ग्राम पंचायतीसाठीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. 
 
Edited By - Priya Dixit