गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 15 ऑक्टोबर 2022 (21:02 IST)

उद्धव ठाकरे यांनीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा राजकीय गेम केला

uddhav and raj thackeray
शिवसेनेचे कार्यध्यक्ष बनण्यासाठी उद्धव ठाकरे यांनीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा राजकीय गेम केला”, असा आरोप शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. ते बुलढाण्यात बोलत होते.
 
“उद्धव ठाकरेंचा आणि शिवसेनेचा काहीही संबंध नव्हता. शिवसेनेचा संबंध केवळ राज ठाकरे यांच्याशी होता. मात्र, उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष बनायचे होते. तेव्हा त्यांच्या पुढे सर्वात मोठी अडचण ही राज ठाकरे यांची होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मनोहर जोशींच्या खांद्यावर बंदूक ठेवत राज ठाकरेंचा राजकीय गेम केला”, असा आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे.
 
’राज ठाकरे यांनी माझं यांचं नाव कार्याधक्ष पदासाठी पुढे करावं, हे बाळासाहेबांना सांगा’ असे उद्धव ठाकरे यांनी मनोहर जोशींना सांगितले होतो. मनोहर जोशी यांनी बाळासाहेबांना तसे सांगितले. त्यामुळे राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा करावी लागली असेही ते म्हणाले. 
 
Edited By -Ratnadeep Ranshoor